पुणे: दारुला पैसे न दिल्याने तरुणाची दगडाने ठेचून हत्या

पुणे (Pune) येथे दारुला पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे: दारुला पैसे न दिल्याने तरुणाची दगडाने ठेचून हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे (Pune) येथे दारुला पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांकडून अधिक तपास लावला जात आहे.

एका व्यक्तीने रात्रीच्या वेळेस रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी तरुणाने त्या व्यक्तीला पैसे देणार नाही असे सांगितल्यावर त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यानंतर व्यक्तीने त्या तरुणाचा पाठलाग केला. तर तरुण एका फुटपाथवर झोपल्यानंतर व्यक्तीने त्याच्या येथे जात डोक्यात दगड घातला.

(नागपूर: ओव्हरटेक करण्याच्या नादात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, अपघाताचा चित्तथरारक व्हिडिओ फेसबुक लाइव्ह मध्ये कैद)

या प्रकरणी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणाच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले. मात्र आरोपी तेथून पळ काढत असताना तेथील लोकांनी त्याला पकडून पोलिसांकडे दिले. सध्या पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2019 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).