सेक्स टॉय वापरुन तरुणीचा महिलेवर बलात्कार; आरोपी तुरुंगात, एक दिवसाची न्यायालयीन कोठडी
police arrested woman in raping case | (Photo credit: archived, edited and Symbolic images)

एका 19 वर्षीय तरुणीला न्यायालयाने एका विचित्र प्रकरणात 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. हे प्रकरण लैंगिक गुन्ह्याशी संबंधीत आहे. आरोपी महिलेने सेक्स टॉय (Sex Toy) वापरुन एका महिलेवर बालात्कार केल्याचा आरोप आहे. बलात्काराची घटना सप्टेंबर 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणात आरोपी महिलेने हे कृत्य करण्यासाठी दोन मित्रांची मदत घेतल्याचाही आरोप होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) समलैंगिता (Homosexuality) (सेक्शन ३७७) गुन्ह्याच्या कक्षेबाहेर ठेवली. त्यामुळे कायदेशीर अडचण ध्यानात घेऊन पोलिसांनी 19 वर्षीय आरोपी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान, पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरुणीचा जबाब नोंदविल्यावर तिला अटक करण्यात आली.

आरोपीची रवानगी तिहार जेलमध्ये

दरम्यान, आरोपी तरुणीने आपल्या मित्रांच्या मदतीने मारहाण करत अनेक वेळा बालात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिला 25 वर्षे वयाची आहे. कडकड्डूमा कोर्टात कलम १६४-क नुसार आरोपी तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने तिला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या तिची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. शाहदरा जिल्ह्यातील पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद)

विचित्र आणि धक्कादायक प्रकरण

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला (वय 25 वर्षे) आणि आरोपी महिला यांचा एका बिझनेस प्लानच्या माध्यमातून संपर्क आला. पीडित महिला या प्लानमध्ये आगोदरपासूनच काम करत होती. दरम्यान, तिची भेट आरोपी महिलेसोबत झाली. दरम्यान, पीडितेची ओळख रोहित आणि राहुल या दोन व्यक्तींशी झाली. हे दोघे 19 वर्षीय आरोपी महिलेचे मित्र असल्याचे समजते. (हेही वाचा, आता या देशातील स्त्रियांची कामोत्तेजना अजून वाढणार; मिळाली फिमेल व्हायग्राला परवानगी)

सेक्स टॉय वापरून बलात्कार

दरम्यान, पीडिता आणि आरोपी यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले. दरम्यान, राहुल आणि रोहीत हे दोगे पीडित महिलेस दिल्लीतील दिलशाद कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले. तेथे त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलाही तेथे उपस्थित असे. ती पीडितेला मारहाण करत असे. तसेच, संबंध ठेवताना ती सेक्स टॉयच्या सहाय्याने पीडितेवर बलात्कार करत असे. या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रिकरणही आरोपी महिला करत असे.