दिल्लीत आज 3,137 नवे कोरोना रुग्ण ; 19 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jun 19, 2020 11:44 PM IST
भारत चीन तणावपूर्ण (India_ China Disputes) परिस्थिती वरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार असून यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, नितीश कुमार यांच्यासहित सर्व पक्षांचे नेते सहभागी असणार आहेत. या बैठकीसाठी आरजेडी ला मात्र आमंत्रित न केल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असताना भारत- चीन वादावर मौन सोडले होते. देशाचे 20 हुन अधिक जवान शहीद झाले आहेत, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताला शांतता हवी आहे मात्र गरज लागल्यास आपणही जशाच तसे उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत असे मोदींनी म्हंटले होते.
दुसरीकडे, महाराष्ट्रात आज शिवसेना पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सेलिब्रेशन अगदी साध्या स्वरूपात आणि ऑनलाईन होणार आहे, ज्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वरून पक्षाची पुढील वाटचाल सांगणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कोरोना संबंधित अपडेट्स पाहायला गेल्यास, देशात सध्या कोरोनाचे 366946 इतके रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात 120504 इतके रुग्ण आढळले आहेत. हे आकडे रोज वाढत आहेत. मात्र अजूनही मृत्यूंची संख्या कमी असल्याने आणि रिकव्हरी रेट हा अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकार कडून सांगितले जातेय.