केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटक येथील 33 नॅशनल हायवे च्या प्रोजक्टे्सचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन ; 19 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Dec 19, 2020 11:49 PM IST
अंगाचा थरकाप उडवून देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape Case) प्रकरणाचा आजही विचार केला तरी लोकांच्या मनात धस्स होतं. एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा घृणास्पद प्रकार या भागात घडला होता. या प्रकरणातील 4 आरोपींना दोषी ठरवत CBI ने यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) वतीनं दोन हजार पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली. आता संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी सुनावणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रामध्ये काल (18 डिसेंबर) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 3,994 रुग्णांची व 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 18,88,767 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 48,574 जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर भारतामध्ये एकूण रूग्णसंख्या 1 कोटीच्या उंबरठ्यावर आहे. कालपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 99 लाख 79 हजार 447 वर पोहोचला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 95,20,827 वर पोहोचली आहे.