Coronavirus Recovery In India: देशात एकीकडे कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत (COVID 19 Update) दिवसागणिक वाढत असताना आज एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असुन एकाच दिवसात तब्बल 60,091 रुग्णांंनी कोरोनावर मात केली आहे, या विक्रमी कोरोना मुक्त रुग्णासंह आजवरच्या कोरोनामुळे डिस्चार्ज मिळवलेल्या रुग्णांंचा आकडा हा 2 मिलियन म्हणजेच 20 लाखावर पोहचला आहे. सध्या देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 73.64 टक्के इतका झाला आहे. दुसरीकडे 18 ऑगस्टपर्यंत देशात एकूण 3,17,42,782 चाचण्या घेण्यात आल्या, यातील 8,01,518 टेस्ट कालच्या दिवसात पार पडल्या आहेत, यानुसार समोर आलेला कोरोना वाढीचा रेट हा अवघा 8. 81% आहे.
भारतात गेल्या 24 तासात 64,531 नव्या कोरोग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तर 1092 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27 लाख 67 हजार 274 इतकी झाली आहे. सध्या 6 लाख 76 हजार 514 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 52 हजार 889 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
ANI ट्विट
The total number of recoveries has crossed 2 million today with highest-ever single day recoveries of 60,091 in the last 24 hours. Recovery rate at 73.64%: Ministry of Health and Family Welfare#COVID19 https://t.co/a4fO3CDyoB
— ANI (@ANI) August 19, 2020
दरम्यान, कोविड-19 (Covid-19) विरुद्धच्या लढाईमध्ये जगातील सर्वात पहिली लस Sputnik V च्या पहिल्या बॅचचे उत्पादन करण्यात आले आहे, अशी माहिती रशियाच्या (Russia) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतातही COVAXIN सहित अन्य दोन कोरोना लसींंच्या चाचण्या विविध टप्प्यात आहेत.