Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Social Media Fake Followers Racket Case: सोशल मीडिया बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी रेपर बादशाहला समन्स ; 18 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Aug 18, 2020 11:54 PM IST
A+
A-
18 Aug, 23:52 (IST)

सोशल मीडिया बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी फौजदारी बुद्धिमत्ता युनिट, मुंबईने रेपर बादशाहला समन्स बजावून 20 ऑगस्ट रोजी हजर होण्यास सांगितले. एएनआयचे ट्वीट- 

 

18 Aug, 23:09 (IST)

झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

 

18 Aug, 22:36 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1224 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 76,157 झाली आहे. तर 1,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,70,391 झाली असून, आज 5,947 टेस्ट घेण्यात आल्या.

18 Aug, 22:28 (IST)

पंचगंगा नदीच्या पाण्याची वाढती पातळी पाहता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1,700 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती मिळत आहे.

18 Aug, 22:13 (IST)

राजस्थानमध्ये आज 1 हजार 347 कोरोनाबाधितांची नोंद झाली आह. तर, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63 हजार 977 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

18 Aug, 21:34 (IST)

कोरोना माहामारीमुळे संपूर्ण देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. याचबरोबर चंदीगड येथील गणेशमूर्तीकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

18 Aug, 20:55 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 3175 रुग्ण आढळले असून 55 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

18 Aug, 20:50 (IST)

हरियाणा 896 रुग्ण आढळून आले असून 7 जणांचा बळी गेला आहे.

18 Aug, 20:39 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे आणखी 931 रुग्ण आढळून आले असून 49 जणांचा बळी गेला आहे.

18 Aug, 20:25 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 11,119 रुग्ण आढळले असून 422 जणांचा बळी गेला आहे.

Load More

ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रवादी आमदार सुधाकर  परिचारक यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना पंढरपूरमधून पुण्यात हलवण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची काल रात्री प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे वय 85 वर्ष होते.

दरम्यान काल अमेरिकेमध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचेदेखील वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. लवकरच त्यांचे पार्थिव शरीर भारतामध्ये आणले जाणार आहे. काही वेळापूर्वी अमेरिकेतील काऊंसलर जनरलनी त्यांच्या पार्थिवाचे न्यूजर्सी शहरामध्ये अंतिम दर्शन घेतले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतामध्ये काल सर्वाधिक 8.97 कोविड 19 साठी चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करून देखील संसर्गाचा दर कमी आला आहे. कालचा दर 8.81% इतका होता तर आठवड्याभरापूर्वी हाच दर 8.84% पर्यंत पोहचला होता. असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


Show Full Article Share Now