ठाण्यातील साकेत झोपडपट्टी भागात आज रात्री आग लागली, कोणतीही जीवितहानी नाही; 17 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jun 17, 2020 11:21 PM IST
कोरोना व्हायरसच्या कठीण काळात आता भारतापुढे अजून एक संकट उभे ठाकले आहे. भारत-चीन सीमावाद काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढू लागला होता. मात्र त्यात दोन्ही सैन्यांनी शांततापूर्व माघार घेतली होती. परंतु, काल लडाख मधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताचे जवळपास 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनी सैन्यातील 43 सैनिक जखमी झाले आहेत.
भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 343091 वर पोहचला आहे. देशातील 153178 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 180013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण 9900 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. बुधवार, 17 जून दिवशी पंतप्रधान दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांसोबत चर्चा करण्यात येईल. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणारी ही सहावी बैठक असेल.