पुणे शहरात आज 1,705 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकूण संक्रमितांची संख्या 34,040 वर; 17 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Jul 17, 2020 11:53 PM IST
मुंबईत गुरुवारी संध्याकाळी (16 जुलै) फोर्ट (Fort) परिसरात भानुशाली इमारतीचा (Bhanushali Building) काही भाग कोसळल्याच्या घटनेने या भागात खूपच खळबळ उडाली आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकाचे बचाव कार्य सुरु आहे. अशात आतापर्यंत 23 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर झधरला होता. अशा परिस्थितीत कच्च्या वा धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ब-याचदा घडतात. अशीच घटना काल मुंबईतील फोर्ट परिसरात घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरु आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून काल सांताक्रूझ येथे 153.6 mm पावसाची नोंद करण्यात आली. काल मुंबईत समाधानकारक पाऊस झाल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दुसरीकडे संपूर्ण देशाभोवती घोंगावत असलेल्या कोरोना व्हायरस विषाणूबद्दल बोलायचे झाले तर, भारताने कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या बाबतीत 10 लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे. Worldometers नुसार, आज संध्याकाळपर्यंत भारतामध्ये कोरोनाचे 1,004,383 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 25,605 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 6,36,541 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना प्रकरणात भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या बाबतीत भारत सध्या आठव्या क्रमांकावर आहे, परंतु आठवड्यात किंवा दहा दिवसांत तो सहाव्या क्रमांकावर येईल.