Live
नागपूर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; पाहा आजची ताजी आकडेवारी; 17 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jan 17, 2021 11:06 PM IST
काल देशव्यापी कोरोना व्हायरस लसीकरणाचा शुभारंभ झाला. काही जणांना लसीचा डोसही देण्यात आला. मात्र CoWIN App आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यात उद्या म्हणजे 18 जानेवारी पर्यंत लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र लवकरच ते पुर्ववत करण्यात येईल, अशी आशा आहे. दरम्यान लस घेतल्यानंतरही सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध प्रदेशांना जोडणाऱ्या व्हाया केवडिया, गुजरात या 8 ट्रेन्सचे उद्घाटन करतील.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीची लाट पसरली आहे. पंजाब, पश्चिम यूपी येथे दाट ते अतिशय दाट धुके पसरले असून हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि मेघालय येथे मध्यम ते घनदाट धुके पहावयास मिळत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.