पश्चिम रेल्वेवर रविवारी भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान 4 तासांचा मेगा ब्लॉक; 16 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 16, 2020 11:57 PM IST
जगभरातील युजर्ससाठी ट्विटर आज पहाटे ठप्प झालं होतं. दरम्यान दीड-दोन तासांनंतर ते पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. काही वेळापूर्वीच युजर्ससाठी ट्वीटरकडून माहिती देण्यात आली आहे. 'सिस्टीममध्ये काहीसा बिघाड झाल्याने सेवा ठप्प झालेली असू शकते हॅकिंग किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणता धोका असल्याची माहिती नाही असे सांगत त्यांनी सेवा पूर्ववत केली आहे.
महाष्ट्रामध्ये परतीच्या पावासाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. निम्म्या महाराष्ट्राला मागील 2-3 दिवसात झोडपून काढले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 17 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईमध्ये प्रवासासाठी अद्याप लोकल ट्रेन सुरू झाल्या नसल्या तरीही हळूहळू व्यवहार सुरू झाले आहे. आजपासून वर्दळीसाठी मुंबई मेट्रो सुरू झाली आहे. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा आता खुली करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये मर्यादीत आसनव्यवस्था उपलब्ध आहे. तसेच आज मेट्रोकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.