पश्चिम बंगालमध्ये आज 15,707 जणांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली; 16 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 16, 2021 11:35 PM IST
आजचा दिवस प्रत्येक भारतीयाला दिलासा देणारा ठरणार आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आज सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसी पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये लसीकरणाला प्रारंभ करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता देशव्यापी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत.
आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेमुळे सर्वच भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार देशभरात तीन टप्प्यात लसीकरण मोहिम राबवणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस यांचा समावेश असणार आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक आणि 50 वर्षाखालील मुधूमेह, रक्तदाब आदी आजाराने पीडित असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे.