DYFI सदस्याच्या निधनाबद्दल कोलकाता येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कामगारांचे आंदोलन; 15 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Feb 15, 2021 11:30 PM IST
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट (Maharashtra Weather Update) उसळली असून मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मात्र हवेच्या गुणवत्ता ढासळली होती. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या आजच्या रिपोर्टनुसार, मुंबईची (Mumbai) हवेची गुणवत्ता सुधारली असून ती खराब वरून आता 'मध्यम' श्रेणीत आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नवी दिल्लीत मात्र हवेचा दर्जा मात्र अधिकाधिक खराब होत चालला असून आजही तो 'अतिशय खराब' या श्रेणीतच आहे. थोडक्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारल्याने येथील नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. तर दुसरीकडे मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी देखील कमी होत चालली असून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता LPG गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच मुंबईत सुप्रसिद्ध राणीची बाग आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.