चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी साकीनाका येथून एका भाजी विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. हरिप्रसाद पटेल, असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे.
चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी साकीनाका येथून एका भाजी विक्रेत्याला अटक; 14 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगभरातील अनेक लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. आज 14 फेब्रुवारी आहे. 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमिकांच्या आवडीचा खास दिवस. बोले तो व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2020) . व्हॅलेंटाईन डे निमित्त जगभरातील जोडपी, प्रेमी युगुलं आणि लहान थोर मंडळी आपापल्या परीने हा प्रेमाचा दिवस साजरा करतात. भारतातही लव्हबर्ड्स आज हा दिवस साजरा करत आहेत. अर्थात व्हॅलेंटाईन उत्साहाने साजरा होत असेला तरी त्याला विरोध करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष व्हॅलेंटाईनला विरोध करतात. त्यामुळे व्हॅलेंटाईन साजरा केल्याच्या आणि त्याला होणाऱ्या विरोधाच्या घटना, घडामोडी यांवर आज लेटेस्टली नजर ठेऊन असणार आहे.
अवघे जग व्हॅलेंटाईन साजरा करत आहे. दरम्यान, भारतात हा दिवस आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. पुलवामा हल्ला ( Pulwama Attack Anniversary) घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे अवघा देश आज पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. असे असले तरी, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हौतात्म्याचा सरकारला आणि विविध संस्थांना विसर पडल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळाली नाही. शहीदांच्या कुटुंबीयांना पाच एकर जमीन देण्याचा सरकारचा वादाही केवळ कागदावरच राहिला आहे. त्यामुळे आज राज्य अथवा केंद्र सरकार या निमित्ताने काही विशेष घोषणा करते का याकडेही लक्ष असणार आहे. (हेही वाचा, Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला)
दरम्यान, दुसऱ्या बाजूला दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणकूण झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवावर भाजपच्या गोटात मंथन सुरु झाले आहे. याचे प्रत्यंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या विधानात येते. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत फटका बसल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, दिल्लीत आपला पराभव झाल्याची कबुलीही अमित शाह यांनी दिली आहे.
दरम्यान, वरील सर्व मुद्द्यांसह अर्थव्यवस्था, कोरोना व्हायरस (Coronavirus), जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण, दळणवळण आदी क्षेत्रातही काय घटना घडामोडी घडातत यावर लेटेस्टली मराठी नजर ठेऊन असणार आहे. म्हणून आज दिवसभरातील घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट्स सोबत जोडलेले राहा.
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा