Close
Advertisement
  रविवार, ऑक्टोबर 06, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

जम्मू काश्मीरः उधमपूर जिल्ह्यातील शिव नगर भागात दुचाकी शोरूममध्ये आग; 14 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Nov 14, 2020 11:50 PM IST
A+
A-
14 Nov, 23:48 (IST)

जम्मू काश्मीरः उधमपूर जिल्ह्यातील शिव नगर भागात दुचाकी शोरूममध्ये आग लागली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाची तीन इंजिने घटनास्थळावर आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, यामध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांना भाजले आहे.

14 Nov, 23:18 (IST)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला आहे. ट्विट-

 

14 Nov, 23:04 (IST)

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात. 'दिवाळीच्या शुभेच्छा आणि साल मुबारक! मी आणि डग एमोफ प्रार्थना करतो की, ही दिवाळी सर्वजण सुरक्षित, निरोगी आणि आनंदाने साजरी करो.'

14 Nov, 22:34 (IST)

राजधानी दिल्लीमध्ये आज कोरोना विषाणूच्या 7340 रुग्णांची व 96 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज दिल्लीत 7117 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 4,82,170 झाली असून, यामध्ये 4,30,195 रिकव्हरी, 7519 मृत्यू व 44,456 सक्रीय रुग्ण समाविष्ट आहेत.

14 Nov, 22:12 (IST)

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात. 'दिव्यांचा उत्सव साजरा करणारे लाखो हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध यांना मी व डॉ. बिडेन यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. आपले नवीन वर्ष आशा, आनंद आणि समृद्धीने भरलेले असो. साल मुबारक.'

14 Nov, 21:53 (IST)

महाराष्ट्र: मुंबईतील भायखळा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये लेव्हल-1 आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चार फायर टेंडर्स दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे काम चालू आहे.

14 Nov, 21:43 (IST)

महाराष्ट्र: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी कारवाईसाठी गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलिस चौकी येथे तैनात जवानांसह दिवाळी साजरी केली.

14 Nov, 21:39 (IST)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 726 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 2,69,130 वर पोहोचली आहे. आज शहरात 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 10,555 झाली आहे.

14 Nov, 21:12 (IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

14 Nov, 20:50 (IST)

कर्नाटक येथे आज 2 हजार 154 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 17 जणांचा मृत्यू आहे. ट्विट-

 

Load More

भारतामध्ये आज दिवाळीचा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे दिवाळीमधील दोन मोठे सण आजच्या दिवशी साजरे केले जात आहे. भारताचे पंताप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देत तुमच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट येवो अशी कामना व्यक्त केली आहे. दरम्यान आजचा दिवस हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देखील आहे. आज बालदिन साजरा केला जात असल्याने देशभरातील चिमुकल्यांना दिवाळीसोबतच बालदिनाच्या देखील शुभेच्छा देत सर्वत्र दिव्यांचा उत्सव साजरा केला जात आहे.

आज सकाळी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी पंडीत नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतिवन येथे स्मृतिस्थळावर जाऊन आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेहरूंना गुलाब प्रिय असल्याने शांतिवन वर आज लाल गुलाबांच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान आज संध्याकाळी लक्ष्मीपुजन देखील साजरे केले जात आहे. देशभरात भाविकांनी आज मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतले आहे. यंदा दिवाळीच्या दिवशी फटाक्यांवर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अगदी साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.


Show Full Article Share Now