Coronavirus: Coronavirus: नव्या64 रुग्णांसह नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 974; 14 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
May 15, 2020 12:02 AM IST
देशभरात सध्या कोरोनाचे महासंकट ओढावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना वारंवार कोरोनासंबंधित माहिती देत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन दरम्यान कोणत्या गोष्टींना सुट दिली जाणार आणि कोणत्या नाही ते 18 मे पूर्वी नागरिकांसमोर जाहीर करण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात विविध राज्यात अडकलेल्या मजूर आणि कामगार वर्गांना आपल्या घरी पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. बारामती येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच काही ठिकाणी गारपीठ पडल्याचे ही दिसून आले. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्याने नागरिकांना दिलासा जरी मिळाला असला तरीही बळीराजाच्या पिकांचे नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 74281 वर पोहचला आहे. तर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 47480 असून 2415 जणांचा आता पर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. नागरिकांनी सद्यची कोरोनाची परिस्थिती पाहता ती गांभीर्याने घ्यावी असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्याचसोबत सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.