झारखंडमध्ये कोरोनाबाधित संख्येत आणखी वाढ झाली असून आज 37 नवे रुग्ण सापडले आहेत. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 761 वर पोहचली आहे. यापैकी 905 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

तेलंगणा राज्यातून एक धक्कादायक बातमी आहे. तेंलगणात 23 पत्रकारांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तेलंगणात आतापर्यंत 60 पत्रकारांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

सुशांतसिंग राजपूत याने मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी आत्महत्या केली. त्याला
श्रद्धांजली म्हणून ओडिशातील Manas Kumar Sahoo नावाच्या शिल्पकाराने वाळूशिल्प साकारुन सुशांत सिंह राजपूत याला श्रद्धांजली अर्पण केली.

ओडीसा येथील एका व्यक्तीने वाळूच्या साहाय्याने छायाचित्र तयार करून त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. एएनआयचे ट्विट-  

 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत सापडले आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे. मुंबईत आज 1 हजार 395 रुग्णांची भर पडली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 958 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 3390 रुग्णांची भर तर 120 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 107958 वर पोहचला आहे.

गोव्यात आज कोरोनाचे नव्याने 41 रुग्णांची भर पडल्याने आकडा 564 वर पोहचला आहे.

गुजरात मधील राजकोट येथे 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के  जाणवले आहेत. यापूर्वी 5.8 तीव्रतेचे हे धक्के असल्याचे सांगण्यात आले होते.

जम्मू-कश्मीर मधील कतरा येथे 3.0 तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गुजरात येथे गेल्या 24 तासात आणखी 511 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 29 जणांचा बळी गेला आहे.

Load More

ठाण्याच्या घोडबंदर (Ghodbandar) मार्गावरील कापूरबावडी (Kapurbawdi) परिसरात शनिवारी रात्री एका कारची झाडाला धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ही भरधाव कार रस्त्यावर जोरात आदळली. त्या कारमध्ये दारूच्या बाटल्यांवरील कागद सापडले ठाणे पोलिस अधिक तपास करत आहे. जखमी झालेल्यांपैकी एक महिला आहे. या चौघांची नावे अद्याप समजू शकली नाही अपघातामागचे नेमकं कारण काय हे निश्चित झालेले नाही.

अनलॉक 1 (Unlock 1) सुरु झाला असला तरीही देशात कोरोनाचा धोका मात्र टळला नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry Of India) माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात आढळून येत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.