Coronavirus Recovery Rate: देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.88 टक्के, एका दिवसात सर्वाधिक कोरोना मुक्त होणार्‍या राज्यांंच्या यादीत महाराष्ट्र अव्वल
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Coronavirus Update: केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या (Health Ministry) माहितीनुसार, आज, 13 सप्टेंंबर पर्यंत देशातील कोरोना रिकव्हर रुग्णांंचा आकडा 37,02,595 इतका झाला आहे यातील 78,399 रिकव्हर रुग्ण तर मागील 24 तासातील आहेत. यानुसार देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 77.88% झाला आहे. प्राप्त माहितीनुसार यापैकी 58% कोरोनामुक्त रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) , तामिळनाडु (Tamilnadu) , आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnatak)  आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आहेत. तर दिलासादायक म्हणजे याच पाच राज्यातुन 57 टक्के रुग्णवाढ दिवसागणिक होत आहे. सद्य घडीला कोरोनाचे सर्वाधिक बरे झालेल्या राज्यांंच्या यादीत पहिल्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे. Health Care Tips During Coronavirus: कोरोना काळात च्यवनप्राश, हळद दुधासहित या गोष्टींंचे रोज सेवन करा- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

महाराष्ट्रात मागील 24 तासात राज्यात 13 हजार कोरोना रुग्णांंची रिकव्हरी झाली आहे यानुसार राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर पोहोचला आहे. तर दुसर्‍या स्थानी आंंध्रप्रदेश असुन या राज्यात मागील एका दिवसात 10,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज च्या अपडेटनुसार, सप्टेंंबर महिन्यात देशात प्रतिदिन 70,000 रुग्ण कोरोनावर मात करत आहेत, एकुण रिकव्हरी ही जवळपास 37 लाखांंच्यावर आहे, जी की अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंच्या तुलनेत 3.8 पट जास्त आहे. सध्याची आकडेवारी पाहिल्यास देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47,54,357 इतकी झाली आहे. सध्या 9,73,175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 78,586 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे