आसाममध्ये आज आठ कोरोना रुग्णाचा मृत्यू ;13 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Aug 14, 2020 12:05 AM IST
कोरोना व्हायरस संकटाशी संपूर्ण जग लढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच देशांच्या सीमा बंद आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B Visa धारकांना अमेरिकेत येण्यास परवानगी दिली आहे. व्हिसा बॅन होण्यापूर्वी ज्या नोकरीत ते रुजू होते. तोच जॉब त्यांना करावा लागणार आहे. या अटीवर अमेरिकेत परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचे आर अँड आर हॉस्पिटलमधून सांगण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी मेंदूतील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया त्यांच्यावर पार पडली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांची कोरोना विषाणूंची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशातसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. मात्र त्याचबरोबर अनेक प्रश्न राज्यासमोर आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्रात चांगलेच राजकारण रंगत आहे. दिवसागणित नवनवी माहिती समोर येत असल्याने प्रकरणाला वेगळाचा रंग चढत आहे. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या/सत्राच्या परीक्षांचा संभ्रम अद्याप सुरुच आहे. परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.