Live
तब्बल 13 तास उलटले तरी मुलुंड, भांडूप परिसरात सुमारे 70% हुन अधिक भाग, तर ठाण्याचा 25% भाग अंधारातच- आमदार आशिष शेलार; 12ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Oct 12, 2020 11:55 PM IST
राज्य आणि केंद्र सरकार लॉकडाऊन संपूर्ण लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत असतानाच दिलासादायक आकडेवारी पुढे येत आहे. गेल्या सलग आठ दिवसात कोरोना व्हायरस संक्रमितांच्या वाढीचा वेग एक हजारांहून कमी असल्याचा पाहायला मिळत आहे. ही आकडेवारी देशपातळीवरील आहे. काल दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या देशभरात 74,383 इतकी राहिली. याचाचर अर्थ काही राज्यांचा अपवाद वगळता देशभरातील कोरोना रुग्णांचा सरसरी वेग हा एक हजारांनी कमी राहिला आहे. तर मृतांचे एकूण प्रमाणही साधारम 1.54% इतके असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील मेट्रो कारशेड हा गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरचित्रसवादाच्या माध्यमातून नागरिकांशी रविवारी संवाद साधला. या संवादात मुंबईच्या आरे येथील कारशेडच्या जागेच्या वादावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोडगा सुचवला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो कारशेड हे आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल, असे स्पष्ट केले. पर्यावरणाचा ऱ्हास करुन कोणत्याही प्रकारची प्रगती आपल्याला मान्य नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
राज्यात कोरोना, अनलॉक, सुरु असतानाच पावसानेही पुन्हा एकदा हजेरील लावायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी पुन्हा इशारा दिला आहे की, राज्यातील काही ठिकाणी पाऊस पुन्हा एकदा आठवडाभर सक्रीय राहणार आहे. घाटमाथा आणि पुणे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकेल. यासोबतच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ आदी ठिकाणीही हलका ते मध्यमस स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमधून मोसमी पाऊस परतत आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मोसमी पाऊस परतण्यात आणखी काही काळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.