पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर ला जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए) आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान (एनआयए) चे उद्घाटन करणार आहेत.

  

उद्धव ठाकरे यांना माझ्या पत्रकारितेत अडचण असेल तर त्यांनी मला मुलाखत द्यावी. मी त्याच्याशी सहमत नसलेल्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चेचे आव्हान देतो, असं रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णब गोस्वामी यांनी एनआयला मुलाखत देताना म्हटलं आहे.

 

अभिनेता अर्जुन रामपालची मैत्रीण Gabriella Demetriades एनसीबी ने 12 नोव्हेंबरला मादक पदार्थ संबंधित प्रकरणात पुन्हा समन्स बजावले आहे.

 

हरियाणामध्ये आज 2,546 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

दलाई लामा यांना भारतरत्नाने सन्मानित करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते शांता कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली आहे.

'सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वास' यांचा विजय झाला, बिहारच्या निकालावर पंतप्रधान मोदी यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

बंगळुरु: कोविड-19 संकटाचा दिवे विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वीही विक्री कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका विक्रेत्यांने सांगितले की, सणासुदीच्या काळात व्यवसायाला  उभारी येईल, अशी आशा होती. परंतु, लॉकडाऊनच्या शिथलीकरणानंतरही अत्यंत कमी विक्री होत आहे. 

मुंबईत आज कोविड-19 चे 1,069 नवे रुग्ण आढळून आले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 2,66,746 वर पोहचला आहे. यापैकी 2,39,800 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 12,674 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 10,503 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये आज 2,584 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,881 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवाळीच्या खरेदासाठी मुंबईच्या दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे.

 

Load More

देशात हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली असून वातावरणात छान गारवा आला आहे. मात्र दुसरीकडे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील प्रदूषण मात्र दिवसेंदिवस अतिशय खराब होत चालले आहे. या प्रदूषणामुळे (Air Pollution) दिल्लीकरांना (Navi Delhi) अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वाचा साराचार विचार करता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील खराब प्रदूषण पाहता 30 नोव्हेंबर पर्यंत फटाके खरेदी करण्यास वा त्याची विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. जर नियमांचे उल्लंघन करुन असे प्रकार कोणी करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA ची सत्ता आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनतेचे आभार मानले आहेत. बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य पोटनिवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली. यामुळे मोदींचा करिश्मा अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रात काल (10 नोव्हेंबर) कोरोना विषाणूच्या 3,791 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 17,26,926 वर पोहोचली आहे. तर 46 रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 44,435 झाली आहे.