कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे गृहराज्यमंत्री म्हणाले, 'प्रकरणाची चौकशी व्हावी पण तोडफोड हा तोडगा नाही. या ठिकाणी आता अतिरिक्त सैन्य तैनात केले गेले आहे. उपद्रवींवर कारवाई केली जाईल.'

फेक फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने आपले निवेदन नोंदवण्यासाठी क्यूकी डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक सागर गोखले यांना समन्स बजावले आहे. एएनआयचे ट्वीट-

 

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून सुशांतसिंह राजपूत प्रकारांची चौकशी सुरु आहे. आज सुशांतची बहीण मितू सिंहची चौकशी करण्यात आली. नुकतीच ही चौकशी पूर्ण झाल्यावर मितू इंफोर्समेंट डायरेक्टरेट कार्यालयातून बाहेर पडली.

दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कामत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेले 10 दिवस त्यांच्यावर Liver Cirrhosis बाबत उपचार सुरु आहेत. 

चिनी संस्था, त्यांचे भारतीय निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या विविध जागांवर शोध कारवाई असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाली- सीबीडीटी

शेल एजन्सीच्या सिरीजद्वारे काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहयोगी मनी लाँडरिंग आणि हवाला व्यवहारात गुंतल्याच्या माहितीच्या आधारे, या चिनी संस्था, त्यांचे निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या जागांवर शोध कारवाई केली गेल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.

पुणे शहरात आज 924 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 67,651 झाली आहे. आज पुण्यातून 1,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,705 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,30,041 झाली असून, आज 5,320 टेस्ट घेण्यात आल्या.

पावसाळ्यात केरळमधील कोझिकोड विमानतळावर Wide-Body विमानांना प्रवेश करण्यास तसेच उड्डाण आणि उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती विमानोड्डाण मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रासोबत मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा विचार करता मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठी आहे. मुंबई महापालिकने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 917 रुग्ण सापडले. तर 1154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 48 रुग्णांची नोंद झाली.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आज दिवसभरात राज्यात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. यातून बाकी राहिलेल्याची प्रकृती वैद्यकीय उपचारानंतर सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

Load More

आज 11 ऑगस्ट रोजी देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिल्ली, मथुरा, वृंंदावनात जन्माष्टमी निमित्त विशेष पुजा पार पडतील मात्र कोरोनाच्या संंकटामुळे भाविकांंना मंंदिरात प्रवेश नसेल. अनेक मंंदिरांकडुन कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासुन अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन या सणाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. सणाच्या उत्साहात कुठेही कोरोनाच्या बाबत हलगर्जी पणा केला जाउ नये यासाठी विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. उद्या सुद्धा याच पार्श्वभुमीवर दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. Happy Janmashtami 2020 Messages: श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status वर शेअर करुन साजरा करा कृष्ण जन्मोत्सव

दुसरीकडे जम्मू-काश्मीर मध्ये रामबानमधील बटोटे येथे अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान पोलिस आणि वनविभागाच्या 18 जवानांवर हल्ला झाल्याने ते जखमी झाले. डीएफओ कुलदीप सिंह यांच्या माहितीनुसार, अतिक्रमण करणार्‍यांसह काही समाजकंटकांनी आमच्या पथकावर हल्ला केला आणि दगडफेक केली. या अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, आज देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रात आज मान्सुन सक्रिय राहणार असुन, मुंंबई, पुणे, कोकण, रायगड, सातारा या भागात अधिक पाउस होईल अशी शक्यता आहे.