राजस्थान: BITS चे उपनिबंधक पिलानी यांची आत्महत्या; 10 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Dec 10, 2020 11:58 PM IST
देशभरातील कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर काहीसा कमी होताना दिसतो आहे. अशात अद्याप अस्तित्वात आली नसली तरी कोरोनावरील लस लवकरच अस्तित्वात येईल या आशेवर भारत आणि अवघे जग मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हटवून अपवाद वगळता परिस्थीती आता पूर्णपणे मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून केला जात आहे.
कोरोना व्हायरस लस निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याचे दावे विविध कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. या कंपन्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धाही पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुरेसा तपशील नसल्याने सीमर, भारत बायोटेक यांच्या लसीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेतील तज्ज्ञांच्या समितीने तातडीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे येणार येणार अशी चर्चा रंगलेली कोरोना व्हायरस लस ही अद्यापही काही काळ लांबणीवर पडली आहे. दरम्यान, लस आली तरीही येणारा काळ हा काळजीचा असल्याचा इशारा तज्ज्ञ इशारा देत आहेत.
एका बाजूला देश कोरोनाविरुद्ध लढत असताना देशभरातील शेतकरी नवा शेतकरी कायदा आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात लढत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेले जुलमी असलेले कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र त्या सर्व चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही आंदोलकांच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तरीही ही चर्चा अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कोणते स्वरुप धारण करते याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.