शिरोमणी दलाचे नेते हरसिमरत कौर बादल यांच्यासह पक्षातील काही नेत्यांना पोलिसांकडून अटक, मोहालीतील जिरापूर येथे फार्म बिलाच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत घडला प्रकार; 1 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Oct 01, 2020 11:47 PM IST
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात 62 लाखाहून अधिक जणांना या विषाणूने आपल्या विळख्यात ओढलं आहे. याशिवाय हजारो जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचं सर्वांच लक्ष कोरोना लसीकडे लागलं आहे. कोरोना लशीसंदर्भातील सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एका पोर्टलची सुरूवात केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व सामान्यांना कोरोना लशीसंबंधी भारतात तसेच जगभरात सुरू असणारे संशोधन, ट्रायलचे टप्पे यासंबंधीची माहिती मिळणार आहे.
दरम्यान, बाबरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आजच्या सामना संपादकीय लेखात भाष्य करण्यात आलं आहे. बाबरी प्रकरणात सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचं फार खळखळ न करता किंवा माथी भडकवण्याचे उद्योग न करता सर्वांनीच स्वागत करायला हवे, असं मत सामनातून शिवसेनेने मांडलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याशिवाय उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असताना आता राज्यात आणखी एक बलात्कार प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.