Close
Advertisement
 
गुरुवार, नोव्हेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
24 minutes ago

नोव्हेंबर महिन्यात जीएसटीचा एकूण 1,04,963 कोटी रुपये महसूल जमा; 1 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Dec 01, 2020 11:38 PM IST
A+
A-
01 Dec, 23:38 (IST)

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जीएसटीचा एकूण 1,04,963 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. ट्विट- 

 

01 Dec, 22:59 (IST)

इन्फोसिस कोलकाता येथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर उभारणार असून जुलै 2021 पासून बांधकाम सुरू होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली आहे.

01 Dec, 22:40 (IST)

दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘Burevi’ पुढील 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान मासेमारीचे काम बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. समुद्रातील मच्छिमारांना किना-यावर परत येण्याचा सल्ला दिला आहे. भारत हवामान विभागा (IMD) ने याबाबत माहिती दिली आहे.

01 Dec, 22:11 (IST)

मुंबईत आज आणखी 724 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

 

01 Dec, 21:37 (IST)

अभिनेता अक्षय कुमार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. ट्वीट-

 

01 Dec, 20:46 (IST)

कायदा मंत्रालयाच्या दोन स्वतंत्र अधिसूचनेनुसार मद्रास हायकोर्टात 10 नवीन अतिरिक्त न्यायाधीश नेमले गेले आहेत.

01 Dec, 19:43 (IST)

महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 4,930 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 6,290 रुग्ण बरे झाले असून, 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 18,28,826 झाली आहे. आतापर्यंत 16,91,412 रुग्ण बरे झाले असून, 47,246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 89,098 सक्रीय रुग्ण आहेत.

 

01 Dec, 19:18 (IST)

फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांच्या यादीची शिफारस करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली आहे. ही समिती कामांची चौकशी करणार आहे. समिती सहा महिन्यांत त्यांचा अहवाल सादर करेल.

01 Dec, 18:54 (IST)

देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत 3 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांसह आणखी एक बैठक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय नेते Joginder Singh Ugrahan यांनी ही माहिती दिली.

01 Dec, 18:14 (IST)

राजधानी दिल्लीत आज 4,006 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून, 5,036 रुग्ण बरे झाले आहेत व 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 5,74,380 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 5,33,351 रुग्ण बरे झाले आहेत व 9,260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 31,769 सक्रीय रुग्ण आहेत.

Load More

महाराष्ट्रामध्ये आज पुणे, औरंगाबाद्,नागपूर मधील शिक्षक,पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली आहे. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी हे मतदान सुरू होणार आहे. या निवडणूकीमध्ये भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मागील काही दिवसांत आपली शक्ती पणाला लावून प्रचार केलेला पहायला मिळाला आहे. त्यामुळे याच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईमध्ये आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी 12 - 12.30 च्या सुमारास उर्मिला मातोंडकर शिवबंधन हातावर बांधणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्या संबोधित करणार आहेत.विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील ही 5 जागांसाठी होणारी निवडणूक 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान करून होणार आहे. तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर केला जाईल.


Show Full Article Share Now