1.36 Lakh Fine For Traffic Rules Break: ट्रॅफिक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन केल्याबद्दल हजारो रुपयांचा दंड आकारल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कुणाला लाखोंचे चालान दिल्याचे तुमची क्वचितच ऐकले असेल. नुकतेच बेंगळुरूमधील (Bengaluru) एका महिलेला रहदारीचे नियम न पाळणे इतके महागात पडले की, तिला 1.36 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हेल्मेट न घालता स्कूटरवरून जात असलेली ही महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेल्मेट न घालता ही महिला तिच्या होंडा ॲक्टिव्हा स्कूटरवरून ट्रिपल सीट चालली होती. म्हणजेच ती तिच्यासोबत इतर दोन लोकांसह प्रवास करत होती. TV9 कन्नडने आपल्या यूट्यूब चॅनलवर सीसीटीव्ही फुटेजची छायाचित्रेही शेअर केली आहेत.
महत्वाचे म्हणजे या महिलेच्या स्कूटरवर 270 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी 1.36 लाख रुपयांचे चालान तर बजावलेच शिवाय तिची स्कूटरही जप्त केली. या चालानची किंमत नवीन होंडा ॲक्टिव्हा स्कुटरपेक्षा जास्त आहे. महिलेने केलेल्या कथित उल्लंघनांमध्ये हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, हेल्मेटशिवाय डबल सीट गाडी चालवणे, हून नेणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Bus Fell From Flyover Video: उड्डाणपुलावरुन बस कोसळली, 5 जण ठार, अनेक जखमी; ओडिसा राज्याती घटना सोशल मीडियावर व्हायरल)
दरम्यान, बेंगळुरूमध्ये रहदारीचे उल्लंघन करणे खूप सामान्य आहे. गेल्या महिन्यातही असेच सुधाम नगर, बेंगळुरू येथील होंडा ॲक्टिव्हा चालकाला 3.04 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अशा प्रकरणात केवळ वाहनच जप्त होणार नाही तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.