Uttar Pradesh: कौटुंबिक वादातून नवविवाहित दाम्पत्याने केले विष प्राशन, उत्तर प्रदेश येथील घटना
Death (Photo Credits-Facebook)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यातील जमराऊ येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परिसरातील नव दाम्पत्याने विष प्राशन (Poisoning) करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दाम्पत्याने कौटुंबिक वादातून हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर, पतीची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू (वय, 23) याचे त्याच्या पित्यासह शनिवारी काही कारणास्तव भांडण झाले होते. ज्यानंतर मोनूने त्याची पत्नी (वय, 20) खुशबू तिच्यासह विष प्राशन केले. त्यानंतर या दोघांना जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी खुशबू यांना मृत घोषीत केले आहे. तर, मोनू याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- UP Crime: उदार घेतलेले 60 रुपये परत मागितले म्हणून 13 वर्षीय मुलाने मित्राची केली हत्या

जहांगीराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक छोटे सिंग यांनी सांगितले की, खुशबूचा या घटनेत त्वरित मृत्यू झाला, मोनूला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे. या वर्षी मे महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.