New Parliament House: नव्या संसद भवनात खासदारांसाठी 1 हजार 350 आसन व्यवस्था; जाणून घ्या प्रकल्पाविषयी खास गोष्टी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

New Parliament House: नवी दिल्ली येथे देशाचे नवीन संसद भवन (New Parliament House) तयार करण्यात येणार आहे. भविष्यात खासदारांची संख्या वाढल्यास त्या सर्वांची बसण्याची सोय या संसद भवनात करण्यात आली आहे. या प्रस्तावित संसद भवनाच्या लोकसभेच्या नवीन इमारतीत 900 आसने असणार आहेत. या संसद भवनामध्ये संयुक्त अधिवेशनादरम्यान 1 हजार 350 खासदार आरामात बसू शकतील. केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलोपमेंटला यासंदर्भात मंजुरी दिली आहे. यासाठी 2024 ची मुदत निश्चित करण्यात आली आहे. नवीन संसद भवन त्रिकोणी आकाराचे असणार आहे. लोकसभा इमारतीत 2 आसनांचे बाक असणार आहेत. तसेच संयुक्त अधिवेशन काळात यावर 3 खासदार बसू शकतील. अशा प्रकारे संयुक्त अधिवेशनादरम्यान एकूण 1 हजार 350 खासदार येथे आरामात बसू शकतात.

गृहनिर्माण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली 3 टप्प्यात ही योजना पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत 3 किमीच्या टप्प्यात असलेल्या 'सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राला' 2021 पर्यंत नवीन रुप दिले जाणार आहे. तसेच 2022 पर्यंत भविष्यातील आवश्यकतेप्रमाणे संसद भवनाच्या नव्या इमारतीची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच 2024 पर्यंत केंद्रीय मंत्र्यांना एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी तिसऱ्या ट्प्प्यामध्ये केंद्रीय सचिवालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सचिवालयात 10 नवे भवन उभारले जाणार आहेत. (हेही वाचा - इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची नेमकी भेट कशी झाली होती? वाचा त्या मागचं सत्य)

या नवीन बांधकामामुळे पंतप्रधान निवासस्थान आणि कार्यालय दिल्लीतील साऊथ ब्लॉकजवळ हलविण्याची शक्यता आहे. तसेच उपराष्ट्रपती यांचे नवीन निवासस्थान नॉर्थ ब्लॉकजवळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान आपल्या निवासस्थानातून पायी कार्यालयात जाऊ शकतील. नवीन संसद भवन बांधण्यासाठी सुमारे 229.75 कोटी रुपये खर्च येणार आहे.