Narendra Modi pays homage to Mahatma Gandhi, Vajpayee (PC - ANI)

Narendra Modi Swearing-in Ceremony: नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज भारताचे पंतप्रधान (PM Modi) म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर महात्मा गांधी आणि दिल्लीतील सदैव अटल येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे युद्ध स्मारकावर मोदींच्या बाजूला दिसले.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त प्रकारशित केलं आहे. तथापि, इंडिया ब्लॉकच्या सदस्यांशी सल्लामसलत करून समारंभात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय खरगे घेणार आहेत. (हेही वाचा - Chandrababu Naidu Oath Ceremony: चंद्राबाबू नायडू 12 जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार)

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) नेता म्हणून निवड झाल्यानंतर, मोदींनी शुक्रवारी अध्यक्ष मुर्मू यांची भेट घेतली. ज्यांनी त्यांना सरकार स्थापनेचे औपचारिक निमंत्रण दिले. तथापी, दिल्ली पोलिसांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीपूर्वी ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये मागील वर्षी जी 20 शिखर परिषदेप्रमाणे अनेक स्तरांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ड्रोन, स्नायपर, निमलष्करी दलाचे जवान आणि NSG कमांडो या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवन कव्हर करतील.