प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मेरठ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (MIET) मध्ये बुधवारी विद्यार्थ्यांच्या एका गटाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला भोसकून ठार (Murder) केले. एसपी, ग्रामीण, केशव मिश्रा यांनी सांगितले की, चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील प्राथमिक तपासानंतर त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमधील वैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मंगळवारी त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर बुधवारी प्रतिस्पर्धी गटातील सदस्यांनी निखिल चौधरीचा कॉलेज कॅम्पसमध्ये भोसकून खून केला.

निखिल चौधरी हा बागपत जिल्ह्यातील शिकोहपूर गावचा रहिवासी होता आणि तो एमआयईटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तो द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून मंगळवारी प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांशी त्याची बाचाबाची झाली.  बुधवारी सकाळी निखिल त्याच्या वर्गात जात असताना प्रतिस्पर्धी गटाचे सदस्य तेथे आले. तो वर्गाबाहेर आला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. हेही वाचा Shocking! चार जणांचा घोरपडीवर सामुहिक बलात्कार; घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना अटक

त्यानंतर त्याच्यावर अनेक वेळा वार केले. गंभीर जखमी निखिलला तत्काळ जवळच्या सुभारती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मिश्रा म्हणाले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून निखिलच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.