घोरपडीवर बलात्कार (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील गोठणे (Gothane) गावाजवळील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एका घोरपडीवर (Bengal Monitor Lizard) बलात्कार (Rape) घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चार शिकारी कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आले होते. त्यांनी गोठणे येथील गाभा परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये विनापरवाना शस्त्रासह कथितपणे प्रवेश केला आणि हा गुन्हा केला. संदीप तुकराम, पवार मंगेश, जनार्दन कामतेकर आणि अक्षय सुनील अशी गुन्हेगारांची नावे आहेत.

महाराष्ट्र वनविभागाने आरोपींचे मोबाईल फोन तपासल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांना या कृत्याचे रेकॉर्डिंग फोनमध्ये सापडले, ज्यामध्ये आरोपींनी घोरपडीवर सामूहिक बलात्कार केल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सांगली वन राखीव विभागात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेतला ज्यामध्ये ते जंगलात फिरताना दिसत आहेत.

या घटनेमुळे गोंधळलेले वन अधिकारी गुन्हेगारांवर नेमके कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल करावे याबाबत चर्चा करत आहेत. यासाठी हे प्रकरण भारतीय दंड न्यायालयाकडे घेऊन जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत राखीव प्रजाती आहे. या प्रकारांत दोषी आढळल्यास, आरोपीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा: पत्नीचा लैंगिक छळ करण्यासाठी पतीने तयार केल्या 11 बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल्स; FIR दाखल)

दरम्यान, राजस्थानमध्ये काही वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. त्यावेळी आठ जणांनी एका पाळीव शेळीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली होती. परंतु शेळी ही पाळीव प्राणी आहे आणि घोरपड ही वन्य प्राणी आहे. त्यामुळे यावर अमरावतीच्या एका तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे.