Ashrin Sulthana (PC - ANI)

Honour Killing in Hyderabad: हैदराबादमध्ये एका हिंदू तरुणाला मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याबद्दल भयंकर शिक्षा भोगावी लागली आहे. बुधवारी रात्री पत्नीसह दुचाकीवरून घरी जात असलेल्या मुस्लिम तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय कार विक्रेत्याला त्याच्या मुस्लिम पत्नीचा भाऊ आणि नातेवाईकांनी मारहाण केली. बी नागराजू असे मृत तरुणाचे नाव असून त्याने तीन महिन्यांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध सय्यद अश्रीन सुलतानासोबत लग्न केले होते.

बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास बी नागराजू हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या दुचाकीवरून घरातून निघाले असता दोघांनी त्यांना अडवून नागराजू यांना दुचाकीवरून ओढले आणि त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. हल्ला होताच घटनास्थळी गर्दी जमली, पण कोणीही नागराजूचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. यादरम्यान अनेक जण हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करत होते. (हेही वाचा - Delhi Police: पंजाब पोलिसांकडून भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना अटक,दिल्ली पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल)

व्हायरल व्हिडीओ दिसत आहे की, नागराजूचे डोके रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची पत्नी मदतीसाठी ओरडत होती, पण कोणीही तिचे ऐकले नाही. पत्नी सुलताना हल्लेखोरांना रोखत राहिली. ती ओरडत राहिली, मदतीची याचना करत होती. त्याला पाहताचं काही लोकांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, त्यानंतर ते तेथून पळून गेले. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. सुलतानाने नंतर हल्लेखोर आपला भाऊ असल्याचे ओळखले. तिचा पती नागराजूचा रस्त्यात सुलतानासमोर मृत्यू झाला, पण त्याला कोणीही वाचवू शकले नाही.

सुलतानाने मीडियाला सांगितले की, 'त्यांनी माझ्या पतीला रस्त्याच्या मधोमध मारले. पाच जणांनी हल्ला केला. यात माझा भाऊ आणि इतर लोकांचा सहभाग होता. आम्हाला मदत करायला कोणीच नव्हते. मी सर्वांकडे माझ्या पतीच्या आयुष्याची याचना केली. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी त्याला मारले. लोक काही करू शकत नसतील तर ते का आले? त्यांनी फक्त पाहिले. डोळ्यांसमोर घडत राहिलं, कुणी मारलं, लोकांना दिसत नाही? त्याला वाचवता यावे म्हणून मी त्याच्यावर पडले. पण त्यांनी मला दूर फेकले. लोखंडी रॉडने वार करून त्याचे डोके फोडले.

नागराजू आणि सुलताना दहावीपासून एकमेकांना ओळखत होते, परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्या धर्माबाहेर लग्न करण्याच्या विरोधात होते. दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन यावर्षी 31 जानेवारीला आर्य समाजात लग्न केले.

नागराजू यांची बहीण रमादेवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'आम्ही मुलीच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आज मी माझा भाऊ गमावला. तो कुटुंबाचा एकमेव कमावणारा होता.'