Crime: मित्रांमध्ये 50 रुपयांवरून झालेल्या भांडणानंतर एका 24 वर्षीय तरुणाची हत्या
(Archived, edited, symbolic images)

मंगळवारी रात्री बेंगळुरूमध्ये 50 रुपयांवरून झालेल्या भांडणानंतर एका 24 वर्षीय तरुणाची त्याच्या मित्राने हत्या (Murder) केली आहे. पोलिसांनी मृताची ओळख शिवमधू, लग्गेरे येथील रहिवासी अशी केली. आरोपीचे नाव शांताकुमार असे असून जो बेंगळुरूमधील जय मारुती नगरचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुबरहल्ली सर्कलजवळ सायंकाळी 7.15 च्या सुमारास ही घटना घडली. शिवमधूने कथितरित्या शांताकुमारच्या खिशातून 50 रुपये घेतले आणि यामुळे तो संतापला, असे पोलिसांनी सांगितले. दोघांमध्ये भांडण झाले आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी शांताकुमारने शिवमधूच्या छातीवर दोनदा वार करून त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

शिवमधूला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवमधूचा भाऊ सिद्धाराजू याने आपल्या भावाच्या मित्राकडून हत्येची माहिती मिळताच पोलीस तक्रार दाखल केली. पोलिस उपायुक्त (पश्चिम) संजीव एम पाटील यांनी सांगितले की, बसवेश्वरनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.