Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

MP: इंदूरच्या अनाथ आश्रमातील 12 मुलांची अन्नातून विषबाधा झाल्यामुळे प्रकृती खालावली, एकाचा मृत्यू

मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका अनाथाश्रमातील मुलांची प्रकृती अचानक बिघडली. एका मुलाचा मृत्यूही झाला आहे. त्याचबरोबर 12 मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य बिघडण्याचे प्राथमिक कारण अन्नातून विषबाधा असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनाथाश्रमात जवळपासच्या जिल्ह्यातील मुलांना ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रीय Shreya Varke | Jul 02, 2024 12:25 PM IST
A+
A-
खाद्यपदार्थ प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

MP: मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका अनाथाश्रमातील मुलांची प्रकृती अचानक बिघडली. एका मुलाचा मृत्यूही झाला आहे. त्याचबरोबर 12 मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य बिघडण्याचे प्राथमिक कारण अन्नातून विषबाधा असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनाथाश्रमात जवळपासच्या जिल्ह्यातील मुलांना ठेवण्यात आले आहे. काल रात्री येथील मुलांची प्रकृती खालावली, त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर 12 मुलांना चाचा नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनाथाश्रमातील मुलांची प्रकृती ढासळल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिष सिंह हेही तेथे पोहोचले आणि व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. हे देखील वाचा: Buldhana Accident: भरधाव कारने तरुणाला उडवले, मलकापूर येथील घटना (Watch Video)

पत्रकारांशी चर्चा करताना ते म्हणाले की ,12 मुलांना चाचा नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल रात्री एका मुलाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी, मुलांचे आरोग्य बिघडण्याचे कारण म्हणजे अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसून येते, नमुने घेतले असून तपास सुरू  झाला आहे.


Show Full Article Share Now