Buldhana Accident: भरधाव कारने तरुणाला उडवले, मलकापूर येथील घटना (Watch Video)
malkapur Accident PC TW

Buldhana Accident: बुलढाणा येथील मलकापूर मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कारने तरुणाला उडवले आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून हिट अॅड रनच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे प्रशासनासमोर सुरक्षतेसाठी चिंता व्यक्त करत आहे. (हेही वाचा- नाशिक फाट्याजवळ कारची एसटी बसला मागून धडक, एसटी बसच्या मागच्या भागाचे नुकसान)

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पायी जाणाऱ्या एक व्यक्तीला भरधाव कारने उडवेल आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्याप्रमाणे कारने व्यक्तीला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की, पादचारी हवेत उडाला. त्याला डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचा व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

या अपघातानंतर कार चालक फरार झाला. इतर स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.