3 Deaths By Heart Attack in UP: अमरोह जिल्ह्यात लग्नसोहळ्यात शोककळा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Heart Attack (Photo Credit - pixabay.com)

3 Deaths By Heart Attack in UP:  उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोघांचा ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वी वधूचा अचानक मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने तिच्या मावशीलाही ह्रदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर लग्न कुटुंबावर शोकाकळा  पसरली आहे. अमरोहात आणखी एका ठिकाणी एका 45 वर्षीय व्यक्तीचा डीजेच्या आवाज सहन न झाल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा- सांगलीत डीजेच्या आवाजामुळे दोघांचा मृत्यू? वाचा तज्ज्ञ काय सांगतात)

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमरोहा येथील बडी बेगम सराय भागात घडली आहे. यासीनची २० वर्षीय मुलगी फरहीन हिचे लग्न ठरले होते. जवळपास महिनाभरानंतर हे लग्न होणार होते आणि दिल्लीत नाते ठरले होते. दोघांची साखरपूडा झाली आणि घरात लग्नाच्या तयारीचे वातावरण होते. गुरुवारी फरहीन घरी काम करत असताना अचानक तिची प्रकृती खालावली. तिला छातीत दुखू लागले आणि ती बेशुध्द झाली.

फरहीनला रुग्णालयात नेले परंतु तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलीच्या निधनाची माहिती मिळताच, तिच्या मावशीला हे दु:ख सहन झाले नाही. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी फूल बी यांना रुग्णालायत दाखल केले परंतु पोहचे पर्यंत त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

ह्रदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू

लग्नाच्या मिरवणूकीत डीजेच्या धणक्यामुळे घोडा गाडी चालकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विजय (४८) असं मृत चालकाचे नाव आहे. मृत्यूनंतर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.  लग्नाच्या मिरवणूकीत आलेल्या घोडा गाडीत विजय चालक होता. भरउन्हात मिरवणूकीत डीजे वाजत होता. त्यावेळी विजयच्या हातीत वेदना झाल्या. त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु तेथे त्याला मृत घोषित केले.