Representational Image (File Photo)

Odisha Shocker: मोबाईल गेमच्या व्यसनात(Mobile Game Addiction) घेतलेले कर्ज न फेडता आल्याने ओडिशामध्ये एकाने आत्महत्या केल्याचे (Man Dies by Suicide)समोर आले आहे. मृत व्यक्तीने लाखोंचे कर्ज घेतले होते. रविवारी रात्री कडुबनी गावातून ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास नायक उर्फ ​​लिंकन असे 22 वर्षीय मृत तरूणाचे नाव असून तो कडुबनी गावातील ब्रजबंधू नायक यांचा एकुलता एक मुलगा होता. कडुबनी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. श्रीनिवास हा सतत गेम खेळत होता. त्यामुळे सावकराकडून त्याने लाखोंचे कर्ज घेतले होते. त्याला कर्ज फेडता येत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. (हेही वाचा: Delhi: जमिनीच्या वादातून दोन गटात वाद, घरात घुसून कुटुंब सदस्यांना मारहाण,2 महिला जखमी)

लिंकनने रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपण्यसाठी गेला. सकाळी तो न उठल्याने कुटुंबीयांनी त्याचा दरवाजा ठोठावला. मात्रष त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. घरच्यांना त्याचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. श्रीनिवास एका खाण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. मोबाईल फोनवर ऑनलाइन गेम खेळताना त्याला लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. (हेही वाचा:Delhi Crime: कारमध्ये बसलेल्या महिलेला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल )

हे नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी आईच्या माध्यमातून गावातील विविध बचत गटांकडून कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तसेच सावकारांच्या दबावामुळे श्रीनिवासने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्यानंतर, पोलिसांनी श्रीनिवासच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

'श्रीनिवासच्या आत्महत्येसाठी कारणीभूत परिस्थिती शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास करत आहोत. त्याचे बँक रेकॉर्ड देखील तपासत आहोत, ज्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारणांवर अधिक प्रकाश पडू शकतो," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.