Delhi: जमिनीच्या वादातून दोन गटात वाद, घरात घुसून कुटुंब सदस्यांना मारहाण,2 महिला जखमी
दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाढवळा शहरात दोन महिलांवर १० जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Delhi: दिल्लीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाढवळा शहरात दोन महिलांवर १० जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काजल आणि सुनिता असं जखमी झालेल्या महिलांची नावे आहे. या घटनेचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- व्हॉट्सॲपवर महिलांना अश्लील क्लिप पाठवणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोक नगर परिसरात ही घटना घडली. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काजलने पोलिसांना तक्रार केली की, १० जण त्यांच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना काठीने मारहाण केली. ही घटना बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी झालेल्या महिलेने सांगितले की, सर्व हल्लेखोर तोंडाला मार्स्क लावून आलेले होते त्यामुळे एकाचाही चेहरा दिसला नाही.
देखिए दिल्ली के न्यू अशोक नगर इलाके का एक CCTV वीडियो सामने आया है,जिसमें करीब 10 लोग नक़ाब डाले हुए एक घर में घुसकर परिवार से मारपीट करते नज़र आ रहे है तेज़ चीख पुकार की आवाजे सुनाई दे रही है @DelhiPolice pic.twitter.com/aIee1Vu7vH— Lavely Bakshi (@lavelybakshi) August 11, 2024
काजलने आरोप केला की, तिच्या मामसोबत जमिनीवरून वाद झाला होता. त्यामुळे मामा आणि त्यांचे मुले यात सहभाग असतील असा अंदाज वर्तवला. पीडितेच्या तक्रारानुसार, कलम 110/351(2)/331 (8)/3 (5) सह 191 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2024 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

