Mob Attacks Foreign Students: अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठातील (Gujarat University) आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री त्यांच्या वसतिगृहात रमजान तरावीहची नमाज अदा केल्याने जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा (Mob Attacks International Students) आरोप केला. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाच विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका व्हिडिओमध्ये जमावाने विद्यार्थ्यांच्या खोलीवर दगडफेक करून आणि त्यांच्या वाहनांवर हल्ला करून वसतिगृहाच्या मालमत्तेची तोडफोड केली. आफ्रिका आणि मध्य आशियातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी सांगितले की, तरावीरची नमाज पढत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. रमजान महिन्यात, तरावीह नमाज ही विशेष प्रार्थना आहेत जी मुस्लिम स्वेच्छेने करतात.
एका व्हिडिओमध्ये भगवी शाल घातलेला एक व्यक्ती विद्यार्थ्यांना शिवीगाळ करताना आणि हिंदुत्वाच्या घोषणा देताना ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये भगवी शाल परिधान केलेले, चाकू आणि बॅट चालवणारे हल्लेखोर हिंदुत्वाचा नारा देताना ऐकू येत आहेत. वसतिगृहाचा सुरक्षा रक्षक जमावाला हल्ला थांबवण्याची विनंती करताना दिसत आहे. मात्र, तो त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही. (वाचा - Bengaluru Accident Video: बीएमटीसी बसच्या धडकेने एकाचा मृत्यू, मन विचलित करणारा Video आला समोरः
पहा व्हिडिओ -
गुजरात यूनिवर्सिटी के हॉस्टल में नमाज़ पढ़ रहे 10 विदेशी छात्रों पर हिंदू संगठन के गुंडों का हमला।
पुलिस के सामने हिंदू संगठन के गुंडे हॉस्टल से बाहर निकल कर चले गए लेकिन पुलिस ने किसी को भी हिरासत में नहीं लिया! pic.twitter.com/i5vKc4nprn
— Sahal Qureshi (Hakim) (@IMSahalQureshi) March 16, 2024
पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं. ते पळून जात आहेत! त्यांनी सर्व काही तोडले. ते निघून जात आहेत. पोलिस त्यांना अटक करत नाहीत. हा लोकशाही देश आहे, हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असं व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी म्हणत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला आणि काँग्रेसचे माजी आमदार ग्यासुद्दीन यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच परदेशी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे की नाही हे अस्पष्ट आहे.