Lasya Nanditha Died: MLA लस्या नंदिता यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, भरधाव कारचं नियत्रंण सुटल्याने घात
MLA Lasya Nanditha PC twitter

Lasya Nanditha Died:  भारत राष्ट्र समिती आमदार लस्या नंदिता (Lasya Nanditha) यांचा शुक्रवारी सकाळी अपघाता झाला आणि अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेलगंणातील संगारेड्डी येथील पाटनचेरूजवळ नेहरू आऊटर रिंग रोड जवळ त्यांच्या अपघात झाला. या अपघाती मृत्यू नंतर तेलंगणा राज्यातील राजिकय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा काम नंदिता करत होती. (हेही वाचा- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन)

मिळालेल्या मिळालेल्या, संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर सुलतानपूर ओआरआर येथून नंदिता कारने जात होती. दरम्यान कारवरील त्यांचे नियत्रंण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात नंदिता यांना गंभीर दुखापत झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस आणि बचावकार्य घटनास्थळी दाखल झाले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पंरतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

स्थानिक वृत्ताच्या माहितीनुसार, नंदिता काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक सभेला जात असताना अपघात झाला होता. नालगोंडा येथे आयोजित जाहीर सभेतून परतत असताना नरकटपल्लीजवळ चेर्लापल्ली येथे एका ऑटोरिक्षाने तिची कार धडकली होती. त्या अपघातात तिचा जीव वाचला परंतु आज सकाळी दुर्दैवाने तिला अपघातात नंदिताचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तेलगंणा राज्यात शोककळा परसली आहे.