Ahmedabad: ऑनलाईन अभ्यासादरम्यान स्वत:चे न्यूड फोटो आणि अश्लील व्हिडिओ केले शेअर, अल्पवयीन मुलीच्या कृत्यामुळे पालकांना हृदयविकाराचा झटका
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

कोरोना महामारीचा शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण (Online Studies) दिले जात आहे. मात्र, ऑनलाईन अभ्यासाच्या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी वाईट सवयींच्या आहारी जाऊ लागले आहेत. याचदरम्यान, गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑनलाईन अभ्यासादरम्यान एका अल्पवयीन मुलीला चक्क स्वत: चे न्यूड आणि अश्लील व्हिडिओ (Nude Photos and Videos) सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे व्यसन जडल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट संबंधित मुलीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांना चक्क हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने हे दोघेही बचावले आहेत.

संबंधित मुलीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ती ऑनलाइन अभ्यास करण्याच्या बहाण्याने स्वत: एका खोलीत बंद करून घ्यायची. दरम्यान, तिच्या पालकांना असे वाटायची की, त्यांची मुलगी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. परंतु, ती ऑनलाइन अभ्यास न करता स्वत: न्यूड फोटो आणि अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची. तिच्या पोस्टला मिळत असलेल्या लाईक्स आणि व्ह्यूज पाहून तिला स्वतःचे न्यूड फोटो आणि अश्लील व्हिडिओ शेअर करण्याचे व्यसन जडले होते. एवढेच नव्हेतर, या मुलीने तिच्या मावस बहिणीलाही असे कृत्य करण्याचा सल्ला दिला. परंतु, तिच्या मावस बहिणीने नकार दिला. हे देखील वाचा-Uttar Pradesh Shocking: भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य, उत्तर प्रदेश येथील घटना

त्यानंतर मावस बहिणीने तिच्या आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट टाकली. मुलीच्या अशा कृत्यांबाबत कळताच पालकांना मोठा धक्का बसला. ज्यामुळे त्यांना हृदयविकाराच झटका आला. अपमानाच्या भीतीने त्यांनी मुलीला फटकारले. तसेच अशा गोष्टी न करण्यास सांगितले. परंतु, याचा मुलीवर काहीच परिणाम झाला नाही. तिने इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो पोस्ट करणे सुरुच ठेवले. अखेर तिच्या आई वडिलांनी मुलीची समजूत काढण्यासाठी 181 महिला हेल्पलाईनची मदत घेतली. 181 महिला हेल्पलाईनच्या एका पथकाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी ऐकण्यास तयार नव्हती. दरम्यान, अनेक घंटे मार्गदर्शन केल्यानंतर या मुलीने तिचे इंटाग्राम अकाउंट डिलीट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीने ज्यावेळी पहिल्यांदा तिचा न्यूड फोटो इंटाग्रामवर पोस्ट केला होता, तेव्हा अनेकांनी तिच्या फोटोला लाईक्स केले होते. तिच्या फोटोवर काही लोक खाणेरड्या कमेंट करायचे पण तिच्या गुप्तांगची स्तुती करायचे, यातून या मुलीला आनंद मिळायचा. तिला याची इतकी सवय झाली होती की, जर तिने दिवसभरात तिचा एकही अश्लील व्हिडिओ टाकला नाहीतर ती बेचैन व्हायची.