
Amazon Senior Manager Murder: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराने (Firing) हादरली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मध्यरात्री दिल्लीतील भजनपुरा (Bhajanpura) येथे घडली. पाच तरुणांनी दोघांवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने अॅमेझॉनच्या वरिष्ठ व्यवस्थापकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाली. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भजनपुरा येथील गल्ली क्रमांक 8 जवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा हरप्रीत गिल (वय, 36) आणि गोविंद सिंग (वय,32) भजनपुरा गली क्रमांक 8 जवळ दुचाकीवर जात होते. दरम्यान स्कूटी व दुचाकीवरून आलेल्या पाच मुलांनी त्यांना अडवले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि तिहार जेलचा अधिकारी Deepak Sharma ची तब्बल 51 लाखाची फसवणूक; हेल्थ प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने घातला गंडा)
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात पोहोचल्यावर हरप्रीत गिलला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हरप्रीत गिल अॅमेझॉनमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक होते. तर गोविंद सिंग यांना गंभीर अवस्थेत एलएनजेपीमध्ये पाठवण्यात आले आहे. गोविंद सिंग हंग्री बर्ड नावाने मोमोचे दुकान चालवतात.
#Amazon Senior Manager Murder Case
दिल्ली में दिल दहला देने वाली घटना हुई है जहां पांच युवकों ने अमेजन के मैनेजर को मौत के घाट उतार दिया है।
आरोपित युवकों ने दिल्ली के भजनपुरा की एक गली में स्कूटी और बाइक से पहुंचकर हत्या की है। इस घटना के बाद हरप्रीत नामक शख्स को तुरंत…
— Ronak Lakhara (@ronak_parihar03) August 30, 2023
सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेमागचे खरे कारण शोधले जात आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.