Boeing Layoff: बोईंगने (Boeing) त्यांच्या व्यावसायिक एरोस्पेस कामगार संघटनेच्या 400 हून अधिक सदस्यांना कामावरून काढून टाकण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या आहेत. बोईंग कंपनी संध्या आर्थिक आणि नियामक समस्यांवर मात करण्यासाठी संघर्ष करत आहे. याशिवाय त्यांच्या मशिनिस्ट युनियनचा 8 आठवड्यांचा संप हे देखील यामागे कारण आहे. गेल्या आठवड्यात, सोसायटी ऑफ प्रोफेशनल इंजिनिअरिंग एम्प्लॉइज इन एरोस्पेस (एसपीईईए) च्या सदस्यांना समाप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, असे सिएटल टाइम्सने वृत्त दिले आहे.
कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या मध्यापर्यंत पगार मिळेल. बोईंगने ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती की, येत्या काही महिन्यांत त्यांचे कर्मचारी 10% किंवा सुमारे 17,000 कर्मचारी कमी करण्याची त्यांची योजना आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ऑर्टबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, कंपनीला आर्थिक वास्तवाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची पातळी रीसेट करावी लागेल. (हेही वाचा -Tech Layoffs 2024: टेक इंडस्ट्रीत नोकरकपात सुरूच; 2024 मध्ये 451 कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले- Report)
SPEEA ने सांगितले की, 438 सदस्यांना टाळेबंदीचा फटका बसला आहे. युनियनचा स्थानिक विभाग 17,000 बोईंग कामगारांचे प्रतिनिधित्व करतो, जे प्रामुख्याने वॉशिंग्टनमध्ये आहेत. या 438 कर्मचाऱ्यांपैकी 218 SPEEA च्या व्यावसायिक संस्थेचे सदस्य आहेत, ज्यात अभियंते आणि शास्त्रज्ञांचा समावेश आहे. उर्वरित तांत्रिक युनिटचे सदस्यांमध्ये विश्लेषक, नियोजक, तंत्रज्ञ आणि कुशल व्यावसायिकांचा समावेश आहे. (हेही वाचा: Amazon Return to Office Rule: Amazon चे कर्मचारी 5 दिवस कार्यालयात परतण्याच्या नियमामुळे संतापले, 73% कर्मचारी सोडणार जॉब)
तथापी, पात्र कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपर्यंत करिअर संक्रमण सेवा आणि अनुदानित आरोग्य सेवांचा लाभ मिळेल. कर्मचाऱ्यांना एक भत्ता देखील मिळेल, जो सहसा प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी सुमारे एक आठवड्याचा पगार असतो. संपानंतर बोईंगचे युनियन मशीनिस्ट या महिन्यात कामावर परतले. या संपाचा बोईंगला आर्थिक फटका बसला.