
Train Carrying Diesel Caught Fire: तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एक भयानक अपघात घडला. डिझेलने भरलेल्या मालगाडीला अचानक आग लागली. काही वेळातच ही आग अनेक डब्यांमध्ये पसरली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले. मालगाडीतील आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आग इतकी भीषण होती की संपूर्ण आकाशात फक्त धुराचे काळे ढग दिसत आहेत.
कोणतीही जीवित नाही -
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. अग्निशमन विभाग आणि बचाव पथकाला आगीची माहिती देण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अधिकारी आगीचे कारण शोधत आहेत.
डिझेल वाहून नेणाऱ्या ट्रेनला आग -
#WATCH | Tamil Nadu: Freight train catches fire near Tiruvallur. Efforts to douse the fire underway. https://t.co/urSEbK1eHf pic.twitter.com/3fv3JnMWLg
— ANI (@ANI) July 13, 2025
रेल्वेच्या बोग्यांमध्ये डिझेल भरलेले होते. आग लागताच डिझेलही जळू लागले, ज्यामुळे आग विझवणे खूप कठीण झाले. ही आग एकामागून एक 4 बोग्यांमध्ये पसरली. ही ट्रेन मनालीहून तिरुपतीला जात होती. वाटेत तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला आग लागली. प्रशासनाने जवळपास उपस्थित असलेल्या लोकांना स्टेशन रिकामे करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे चेन्नईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण रेल्वेने 8 गाड्या रद्द केल्या असून 5 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.