Fire At Sofa Factory In Greater Noida: ग्रेटर नोएडा येथील एका सोफा कारखान्यात मंगळवारी भीषण आग लागली. या आगीत तीन कामगार जागीच ठार झाले. कारखाना क्रमांक 4 जी मध्ये कामगार झोपलेले असताना आग लागल्याने या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 23 वर्षीय गुलफाम (रा. मथुरा), 29 वर्षीय मजहर आलम (रा. कटिहार, बिहार) आणि 24 वर्षीय दिलशाद (रा. अररिया, बिहार) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
ग्रेटर नोएडाचे एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, ठाणा बीटा 2 क्षेत्रांतर्गत साइट 4 च्या फॅक्टरी क्रमांक 4G मध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू केले. शोध मोहिमेदरम्यान, कारखान्यात तीन जणांचे मृतदेह सापडले असून ते ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा -Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग; 2 जण रुग्णालयात दाखल)
ग्रेटर नोएडा येथील सोफा कारखान्यात आग, पहा व्हिडिओ -
ग्रेटर नोएडा के बीटा-2 थाना क्षेत्र में मंगलवार को एक सोफा बनाने वाली फैक्ट्री में भीषण आग लग गई।स्थानीय पुलिस और दमकल विभाग की टीम तुरंत मौके पर पहुंची। दमकलकर्मियों ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया। हालांकि, इस हादसे में तीन लोगों की जान चली गई। ग्रेटर नोएडा @noidapolice pic.twitter.com/58KRmt77f5
— Mohd Bilal | ↕️ (@BilalBiswani) November 26, 2024
दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. या अपघातामुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारखान्यात आग विझवण्याची पुरेशी व्यवस्था होती का? याचाही पोलिस तपास करत आहेत.