iNCOVACC Vaccine: प्रजासत्ताक दिनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी एक शस्त्र तयार; पहिली नाकावाटे देण्यात येणारी 'इन्कोव्हॅक' लस लाँच
iNCOVACC Vaccine (PC - Twitter)

iNCOVACC Vaccine: प्रजासत्ताक दिनानिमित्त, देशातील पहिली नाकावाडे देण्यात येणारी (Intra-Nasal) कोविड-19 Incovac लस लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh L. Mandaviya) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी ही लस लॉन्च केली. ही स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकने (Bharat Biotech International Limited) बनवली आहे.

शनिवारी, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनी लॉन्च करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत बायोटेकने घोषणा केली होती की, ते सरकारला प्रति शॉट 325 रुपये आणि खाजगी लसीकरण केंद्रांना प्रति शॉट 800 रुपये दराने लस विकणार आहे. (हेही वाचा - COVID-19 रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत; फुफ्फुसांत संसर्ग होण्याचा धोका टळणार)

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (WUSM) च्या सहकार्याने भारत बायोटेकने नाकाची लस विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही कोरोनाची पहिली स्वदेशी लसही तयार केली होती. भारत बायोटेकने नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला iNCOVACC असे नाव दिले आहे. यापूर्वी याचे नाव BBV154 असे होते. ही लस नाकातून शरीरात पोहोचवली जाते. ही लस शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण दोन्ही रोखते.

यापूर्वी, 6 सप्टेंबर रोजी, DGCI ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी आपत्कालीन वापरासाठी, Intranasal COVID-19 लस, Incovac ला मान्यता दिली होती. भारत बायोटेकने डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टरसाठी बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला होता. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही लस बूस्टर म्हणून दिली जाईल. प्रत्येक व्यक्तीला त्याचे चार थेंब दिले जातील.