Manish Sisodia | (Photo Credits: Facebook)

Delhi Liquor Scam: दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) शनिवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Former Chief Minister Manish Sisodia) यांची अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यात 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली.

विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी ईडी खटल्यातील सिसोदिया यांच्या कोठडीत 8 मे पर्यंत वाढ केली आहे, या प्रकरणात यापूर्वी देण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. (हेही वाचा - Mukhtar Ansari Gangster Case: गँगस्टर प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड)

न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर म्हटलं आहे की, पुरावे गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे सांगतात. सिसोदिया या खटल्यातील प्रमुख साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाने 31 मार्च रोजी सीबीआयने तपास केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या सिसोदिया यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. त्यांनी आपल्या जामीन अर्जात न्यायालयाला सांगितले आहे की, केंद्रीय एजन्सीकडे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत.