Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Odisha Shocker: ओडिशात पत्नीचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने बाण (Arrow) मारून पत्नीची हत्या केली. केंझार जिल्ह्यातील हंडीभंगा (Handibhanga ) गावात बुधवारी, 1 जानेवारी रोजी रात्री हत्येचा प्रकार घडला. दसरा मुंडा (50) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पीडितेचे नाव चानी मुंडा असे आहे.(Stray Dogs Attack On Girl: अलवरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 7 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दसरा मुंडा यांना त्यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर मुंडा यांनी पत्नी चनी मुंडा यांची हत्या केली. मोठा रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी महिलेला तातडीने झुमपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.(Delhi Horror: दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून वाद, तरुणाचा मृत्यू, दोघांना अटक)

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले. त्यांनी मृत महिलेचा मृतदेहही ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी केओंझर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासादरम्यान, कथित विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून या जोडप्यामध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.