Making Reels on Railway Track Pixabay

Bihar Accident: बिहारच्या (Bihar) चंपारण जिल्ह्यात रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढण आणि रिल्स बनवणे तरुणांना महागात पडलं आहे. रेल्वे ट्रॅकवर दोन तरुण रिल्स बनवत असताना भीषण अपघात झाला आहे. यात त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील माझौलिया पोलिस स्टेशन अंतर्गत परसा हॉल्ट येथे घडली. रक्सौला - नवी दिल्ली सत्याग्रह एक्सप्रेस ट्रेनने भरधाव वेगाने जात असताना ट्रेन खाली दोन्ही तरुण चिरडले आणि त्याचा मृत्यू झाला.( हेही वाचा- समृद्धी महामार्गावर रिल्स बनवणाऱ्यांवर बंदी, पोलिसांचा गंभीर इशारा)

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आणि सूरज कुमार अशी मृतांची  ओळख पटली आहे. दोघे जण पारसा येथील रेल्वे ट्रकवर रिल्स बनवत होते. दरम्यान वेगवान ट्रेन मागून आली हे त्यांना समजलेच नाही क्षणात दोंघान्हा ट्रेनने उडवल्याचे सांगितले जात आहे. दोघांन्ही कानात इअरफोन घातले होते. त्यामुळे त्यांना ट्रेन आल्याचे समजले नाही. दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

कन्हैया आणि सूरज हे दोघे ही चंपारण येखील अमवा बैरागी गावातील रहिवासी होते. मझौलिया पोलिस स्टेशनचे हाऊस, ऑफिसर अखिलेश कुमार मिश्रा यांनी अपघाताची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांन्ही कानात इयरफोन घातले होते त्यामुळे एक्स्प्रेस ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही त्यांना ट्रेनची जोरात धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि कुटुंबियांना सोपवले.