Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये दोन जणांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये महिलेला दोघांन्ही ड्रग्जयुक्त कोल्ड ड्रिंग दिले. त्यानंतर ती बेधुंद अवस्थेत होती. याचा फायदा घेत दोघांन्ही बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवला. (हेही वाचा- गरम समोसा मागणे पडले महागात, मुंब्रामध्ये दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मेरठ येथील रहिवासी आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तीने तक्रारीत म्हटले की, आरोपी आणि तीचा इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीनंतर त्यांनी हॉटेलमध्ये भेटायला बोलवले होते. त्याने असा दावा केला की, तो बॅंकेत कामाला आहे. नोकरी मिळवून देण्याचा त्याने ऑफर दिली. आरोपीने त्याच्या मित्राला पाठवले आणि डेहराडून येथे बोलावून घेतले. पण तो तेथे भेटला नाही.
त्यानंतर त्याच्या साथीदाराने तीला शामली जिल्ह्यातील ठाणेभवन येथे नेले. त्याच ठिकाणी मुख्य आरोपीला तिला भेटला. दोघांन्ही मिळून महिलेला ड्रग्ज युक्त कोल्ड ड्रिंग्ज दिले. महिला बेधुंद अवस्थेत होती. याचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु झाली. पोलिसांनी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.