Mahua Moitra (PC - ANI)

FIR Against Mahua Moitra: तृणमूल काँग्रेस (TMC) लोकसभा खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 79 नुसार एफआयआर नोंदवला आहे. महुआ मोइत्रा यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती.

मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर टिप्पणी केली होती. मात्र, नंतर पोस्ट हटवली. टीएमसीच्या खासदाराने पोस्ट केलेल्या टिप्पणीबद्दल माहिती घेण्यासाठी पोलीस आता X शी संपर्क साधत आहेत.

NCW ने शुक्रवारी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली की, 'राष्ट्रीय महिला आयोग खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर स्वतःहून कारवाई करत आहे. त्यांनी एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. अपमानास्पद वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाचा अधिकार कमकुवत होतो. आयोगाचा असा विश्वास आहे की ही टिप्पणी भारतीय दंड संहितेच्या कलम 79 अंतर्गत आहे. मी अशा अपमानास्पद टिप्पण्यांचा तीव्र निषेध करते आणि महुआ मैत्रावर कठोर कारवाई करण्याची विनंती करते. (हेही वाचा - Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल- रिपोर्ट)

रेखा शर्मा यांच्या तक्रारीवरून महुआ मोईत्राविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सेलने भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 79 नुसार गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 79 अंतर्गत (शब्द, हावभाव किंवा एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने) दिल्ली पोलिसांनी संबंधित माहिती मागितली आहे.